भंडाºयात कॉंग्रेसचे ‘जलसमाधी आंदोलन’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार युवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत आज दि.१५ मे २०२६ रोजी भंडाºयातील कारधा येथे वैनगंगा नदी पात्रात भव्य ‘जलसमाधी आंदोलन’ सुरू केले आहे.या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,भंडारागोंदियाचे खा डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाने जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधूले आहे. आजच्या जलसमाधी आंदोलनाचा इशारा कॉंग्रेसने काही दिवसांअगोदरच दिला होता. त्यामुळे पहाटेपासूनच कारधा परिसरात हजारो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. हातात फलक, घोषणांनी दणाणलेला परिसर आणि नदी पात्रात उतरलेले आंदोलक यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

‘शेतकºयांना न्याय द्या’,धान खरेदीची लिमिट वाढवुन द्या,ओबीसीची स्वतंत्र जणगनना करा, ‘सरकार जागे व्हा’ अशा घोषणांनी वैनगंगा नदीकाठ दणाणून गेला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाºयांवर जोरदार टीका करत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्याप्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून आंदोलने, निवेदने आणि बैठका होत असतानाही प्रश्न प्रलंबितच असल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसने अखेर जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यापूर्वी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्याशी चर्चा करून मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने काँग्रेसने सरकारच्या आश्वासनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘फक्त बैठका आणि आश्वासने’ पण प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात काहीच नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनस्थळी बॅरिकेट्स उभारण्यात आले होते, तसेच नदी परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बोटींचीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले, मात्र आंदोलकांचा आक्रोश आणि संताप स्पष्टपणे दिसून येत होता.

आंदोलनात माजी आमदार दिलीप बंसोड,कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई,महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर,जि.प.सदस्य रमेश पारधी, प्यारेलाल वाघमारे,पव वंजारी,कलाम शेख, जि.प.अध्यक्ष कविता उईके, सभापती शितल राऊत,सविता वाघाये, उमेश मोहतुरे,यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्हयातील कॉंगे्रस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

आंदोलनस्थळी बॅरिकेट्स उभारण्यात आले होते, तसेच नदी परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बोटींचीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले, मात्र आंदोलकांचा आक्रोश आणि संताप स्पष्टपणे दिसून येत होता. आंदोलनात माजी आमदार दिलीप बंसोड,कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई,महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर,जि.प.सदस्य रमेश पारधी, प्यारेलाल वाघमारे,पव वंजारी,कलाम शेख, जि.प.अध्यक्ष कविता उईके, सभापती शितल राऊत,सविता वाघाये, उमेश मोहतुरे,यांच्यासह भंडारा गोंदिया जिल्हयातील कॉंगे्रस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *