
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात काल रात्री काही भागात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मध्य रात्रीच्या सुमारास वादळी वाºयासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारे आणि गारपीट व मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे छत उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत ओवारा गावांमध्ये जवळपास २० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुर- वठाही खंडित झाला. रात्री वीजपुरवठाही खंडित झाल्याने लोकांना याचीही मोठा त्रास सहन करावा लागला, तर नुकसान झालेल्या लोकांचे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी व नुकसान झालेल्या लोकांनी केली आहे. त्याच प्रमाणे काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकºयांनाही बसला असून धान, भाजीपाला, मका आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. तर दुसरी कडे जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आह तर काही ठिकाणी कापणीसाठी आलेले धान पावसामुळे आडवे पडले असून शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापून ठेवलेले धान पिक हे आता खराब होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे .दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे.