झिरोबा जंगलात ‘आॅपरेशन वॉश आउट’ अंतर्गत ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर: लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिरोबा येथील झुडपी जंगलात पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बेकायदेशीरपणे मोहफुलाची दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला तब्बल ८५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकदरसिंग ज्योतीसिंग जुनी (वय ३२ वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. झिरोबा, ता. लाखांदूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी लाखांदूर पोलीस ठाण्याचे टाउन बीट अंमलदार पोलीस हवालदार संतोष गणेश चव्हाण हे सहकाºयांसह परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, झिरोबा येथील जंगलात आरोपी मुकदरसिंग याने मोहफुलाची दारू काढण्यासाठी प्लास्टिकआणि लोखंडी ड्रममध्ये ‘सडवा मोहा पास’ गाडून ठेवल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पंचांना सोबत घेऊन सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जंगलात धाड टाकली. यात ८५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहफुल सडवा पास ५ प्लास्टिक ड्रममध्ये प्रत्येकी ५० लीटर याप्रमाणे २५० लीटर (किंमत २५,००० रुपये).प्लास्टिक पिशव्यांमधील सडवा ५ प्लास्टिक थैल्यांमध्ये प्रत्येकी १०० लीटर याप्रमाणे ५०० लीटर (किंमत ५०,००० रुपये), दारू गाळण्याचे साहित्य ३ लोखंडी ड्रम(किंमत ३,००० रुपये), प्लास्टिक ड्रम (५,००० रुपये), टवरा, प्लास्टिक पाईप आणि जळाऊ लाकूड. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालापैकी रासायनिक परीक्षणासाठी ९० मिली सडवा मोह पासाचा नमुना काचेच्या बाटलीत सीलबंद करून ताब्यात घेतला. मात्र, इतर साहित्य दुर्गम भागातून वाहून आणण्यासाठी साधन नसल्यामुळे, उर्वरित सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी मुकदरसिंग जुनी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा (म.दा.का.) कलम ६५ (फ) अन्वये लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नैताम, पोलीस शिपाई मैद आणि पोलीस शिपाई चव्हाण यांनी केली. पुढील तपास लाखांदूर पोलीस करत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *