गर्रा-बघेडा येथे शितल गॅस सिलिंडर वितरणासाठी ग्राहकांची मोठी गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : आज गर्रा-बघेडा येथे शितल गॅस एजन्सीची गॅस सिलिंडर वितरण करणारी गाडी दाखल होताच ग्राहकांनी मोठी गर्दी केली. घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक सकाळपासूनच प्रतीक्षेत होते. गाडी आल्यानंतर ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी रांगा लावल्या. अलीकडील काळात वाढलेल्या मागणीमुळे अनेक ग्राहक सिलिंडरच्या प्रतीक्षेत असल्याने गाडी येताच मोठ्या संख्येने नागरिक वितरण केंद्राजवळ जमा झाले. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचीही उपस्थिती लक्षणीय होती. वितरण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित कर्मचाºयांनी नियोजनबद्ध पद्धतीने सिलिंडरचे वाटप केले. ग्राहकांनी वेळेत गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. काही काळ परिसरात गदीर्चे वातावरण निर्माण झाले असले तरी वितरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. त्यामुळे नागरिकांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले गॅस सिलिंडर वेळेत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *