
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गेल्या तीन महिन्यांपासून साकोली तालुक्यातील आमगाव बु., उमरझरी व परिसरात दहशत निर्माण करणाºया ‘टि-२७’ वाघिणीला अखेर रविवारी यशस्वी रेस्क्यू आॅपरेशनद्वारे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. आमगाव बु. येथील गहाणे यांच्या शेतातील वाडी परिसरात वाघीण लपून बसल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या तथा भाजप महिला जिल्हाध्यक्षा माहेश्वरी नेवारे यांना मिळताच त्यांनी तत्काळ सहाय्यक वन्यजीव प्रकल्प अधिकारी सुहास कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया व भंडारा वनविभागाची NN RRT टीम तसेच ऋऊउट भंडाराच्या वनकर्मचाºयांनी संयुक्तपणे रेस्क्यू आॅपरेशन राबवून वाघिणीला सुरक्षितपणे जेरबंद केले. या यशामुळे नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून परिसरात पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून ही वाघीण आमगाव, उमरझरी, बांपेवाडा, पिटेझरी, जमनापूर, खांबा, वडेगाव, विरसी, सातलवाडा आदी परिसरात वावरत होती. १९ मार्च रोजी बांपेवाडा येथे वसंत मेश्राम, २८ मार्च रोजी उमरझरी येथे माया सोनवणे यांचा बळी गेला होता, तर १ एप्रिल रोजी आमगाव येथे छाया मुंगमोडे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर २४ जून रोजी हरिश्चंद्र श्रीराम मडावी या ४५ वर्षीय शेतकºयावरही वाघीणिने हल्ला करून जखमी केले होते. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यासाठी वनविभागाने तब्बल १७० हून अधिक कर्मचारी, ९० ट्रॅप कॅमेरे आणि ८पिंजरे लावून मोठी शोधमोहीम राबवली होती. मात्र यश मिळाले नव्हते. वनविभागाच्या माहितीनुसार,जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीवर आवश्यक वैद्यकीय उपचार करून तिला गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहाय्यक वन्यजीव प्रकल्प अधिकारी सुहास कांबळे, आरएफओ नरेंद्र सावंत, नवेगावनागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया व भंडारा वनविभाग, NN RRT आणि FDCM भंडारा येथील अधिकारी व कर्मचाºयांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे नागझिरा अभयारण्यालगतच्या साकोली परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत वनविभागाच्या प्रयत्नांचे स्वागत केले.