कुणबी समाज म्हणतोय, आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : ‘कुणबी समाज म्हणतोय,’आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’ या भूमिकेतून कुणबी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी चार प्रमुख मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंतीपुण्यतिथीचा अधिकृत कार्यक्रमांत समावेश आणि ओबीसी जातनिहाय जनगणना या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी, युवक, महिला आणि उद्योजकांना आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या महामंडळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देऊन त्यामार्फत स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसाय, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्याच्या योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुणबी समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतेनुसार मुला-मुलींची स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळू शकेल. निवेदन देताना मोरेश्वर सार्वे,डॉ.आशिष माटे,राधेश्याम गाढवे, ईश्वर माटे, लोकेशसार्वे, शोभाराम तिजारे, पुरुषोत्तम शेंडे, हरिदास मते, हंसराज आगाशे, शुभम सिंगनजुडे, शुभम धूमनखेडे, विजेंद्र झंजाडे, शंकर मोहतुरे, अमित मारवाडे, अनिल सेलोकर, अतुल आस्वले, डॉ. शरद गोमासे, हेमंत लोंदासे, अशोक बोंद्रे, मधुकर बुरडे, मयूर तिजारे, रमेश हारगुडे, भैय्या काळे, दुर्जन ढेंगे, अनिल बांडेबुचे, राजू माटे, राजेश चामट आदी बहुसंख्या कुणबी समाज बांधव उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *