अवैध सागवान लाकडाची वाहतूक करणारे पिकअप वनविभागाच्या जाळ्यात!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी देवरी : उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणारे पिकअप वाहन वनविभागाच्या कर्मचाºयांनी पकडले. या कारवाईत वाहनासह सुमारे १ लाख ६ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार ५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर देवरी वन विभागाचे वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना एमएच ३६ /एए ४३९७ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे वनकर्मचाºयांनी सापळा रचून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. वनकर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे वाहन ताब्यात घेण्यात यश आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागवान जातीचे एकूण ६ नग लाकूड आढळून आले. जप्त करण्यातआलेल्या लाकडाचे एकूण घनफळ २.०८४ घनमीटर असून त्याची अंदाजित किंमत १ लाख ६ हजार ८०९ रुपये आहे. दरम्यान, वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून वनविभागामार्फत त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी वाहन व लाकूड जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वनगुन्हा क्र. ०१/२०२६/९८५४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनविभागामार्फत सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *