इμकोच्या वतीने गर्रा-बाघेडा येथे शेतकरी मेळावा व पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा-बाघेडा : तुमसर तालुक्यातील गर्रा-बाघेडा येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोआॅपरेटिव्ह लिमिटेड (इμको) यांच्या वतीने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी शेतकरी मेळावा व पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रगतिशील शेतकरी प्रकाशजी दुर्गे यांच्या शेतात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा व्ही.सी.एम.एफ.चे जिल्हा विपणन व्यवस्थापक सुनील डापकर होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून इμकोचे गोंदिया व भंडारा क्षेत्र अधिकारी श्रेयस महुले यांनी केले. प्रमुख पाहुणे तुमसर तालुका कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) थांडे साहेब तसेच पंचायत समिती सदस्य राजेशभाऊ ठाकूर, गोपीचंद गायकवाड, अशोक ठाकूर, नामदेव चौधरी, प्रकाश दुर्ग आणि गावातील शेतकरी उपस्थिती होते.

या मेळाव्याच्या माध्यमातून इμकोने विकसित केलेल्या नॅनो युरिया प्लस आणि नॅनो डीएपी या द्रवरूप खतांची माहिती शेतकºयांना देण्याचा उद्देश आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, नॅनो खतांचा योग्य उपयोग, खतांची कार्यक्षमता आणि शेतीतील उत्पादनवाढ याविषयी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणी करण्याच्या आधुनिक पद्धतीची माहिती देण्याचाही या उपक्रमात समावेश आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक अनिल गौरेकर यांनी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *