भाऊबीजेला माहेरी जातांना अपघात ; महिला गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : भाऊबीज निमित्य भावाला ओवाळणीसाठी पतीसह दुचाकीने माहेरी जात असताना मागेहुन भरधाव वेगाने मध्य धुंद अवस्थेत असलेल्या युवकाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेसह मद्यधुंद युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर ते वडसा राष्ट्रीय महामार्गावरील चप्राळ पहाडीनजीक घडली. रोषण देवानंद पचारे (२५) रा सोनी व गीता राजकुमार जांभुळकर (४७) रा मडेघाट असे अपघातातील जखमींची नावे आहेत. सविस्तर असे की, भाऊबीज असल्याने घटनेतील जखमी महिला गीता पती राजकुमार सोबत माहेरी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथे मालकी दुचाकीने जात होते.

दरम्यान लाखांदूर वरून सोनी कडे दुचाकीने रोशन जात होता. त्याची दुचाकी भरधाव वेगाने असल्याची माहिती जखमींसह परिस- रातील नागरिकांनी दिली आहे. दरम्यान, दुचाकीने जात असताना रोशनने समोरील दुचाकीला मागेहुन धडक दिल्याने अपघात झाला. यात रोशन सह भाऊबीजेला जाणारी महिला रस्त्यावर पडल्याने गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी दोन्ही जखमींवर उपचार केला असता यातील दोन्ही जखमींची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वृत्त लिहितोवर पोलीस तक्रार झाली नसल्याची माहिती देण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *