कोदामेढीत दोन गटांत तुफान राडा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर: लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी येथे लग्न जमविण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले. या वादातून कथितरीत्या गैरकायद्याचा जमाव जमवून शिवीगाळ, मारहाण, महिलेचा विनयभंग आणि अल्पवयीन मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिघोरी /मोठी पोलिसांनी कार्तिक मोहनलाल वडसकर याच्यासह एकूण २९ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी उमेश दुर्योधन चव्हाण (वय २९, रा. कोदामेढी) यांच्या भाचीचे लग्न आरोपीच्या मामाच्या मुलासोबत जमविण्याच्या कारणावरून वाद निर्माणझाला. या वादातून आरोपींनी एकत्र येत फिर्यादी पक्षाशी वाद घातल्याचा आरोप आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले.

फिर्यादीच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मुख्य आरोपी कार्तिक वडसकर याने तिचा हात धरून ओढत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर काही आरोपींनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने फिर्यादी व मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेतील सर्वाधिकगंभीर बाब म्हणजे साक्षीदार रत्ना जगताप यांच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने सोबत ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचेही तक्रा- रीत म्हटले आहे. वेळीच हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर जखमींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून दिघोरी पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक २१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११७(२), ११८ (१), २९६, १८९(२), १८९(४), १८९ (५), १९०, १९१(२), १९४ (२), ३५२ व ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बुरांडे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *