शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरपंचांचा एल्गार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यात वाघ, बिबट्या, अस्वल यांसह अन्य वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्या आणि शेतशिवारातील वाढता वावर आता नागरिकांच्या जीवितावरच बेतू लागला आहे. दोनाड येथे बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असतानाच वन्यप्राण्यांच्या वाढत्या दहशतीविरोधात तालुका सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. नागरिक व शेतकºयांच्या सुरक्षिततेसाठी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी १७ नोव्हेंबर रोजी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने आणि लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देण्यात आले. सध्या धान कापणी, मळणी आणि रब्बी हंगामातील शेतीकामांना वेग आला असताना शेतशिवारात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना जीव मुठीत धरून शेतीकामे करावी लागत आहेत. शेती करायची की जीव वाचवायचा, असा गंभीर प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.

वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकºयांनी शेतीकामे सोडायची काय, असा संतप्त सवाल सरपंच संघटनेने उपस्थित केला आहे. तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये नियमित वनगस्त वाढवावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी, धोकादायक परिसरात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन जनजागृती करावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी वनविभागाचे विशेष पथक सज्ज ठेवावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. एखाद्या निष्पाप बालकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाने केवळ कागदी उपाययोजनांपुरते मर्यादित राहू नये.

आणखी एखाद्या दुदैर्वी घटनेची प्रतीक्षा न करता नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी, अशीठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. निवेदनाची तातडीने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती संघटनेला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच अरुण बावणकर, सचिव अस्मिता लांडगे, कोषाध्यक्ष सुधीर मिसार, पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे, तालुका भाजपा अध्यक्ष डेलीस ठाकरे, सरपंच तुळशिदास बुरडे, शिवदास बुरडे, नानाजी आडकिणे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य सरपंच उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *