भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : पवनी तालुक्यातील पालोरा ते कोंढा-बेलाटी फाटा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा शेतकºयांनी तुरीची लागवड केल्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्याच्या कडेला उंच वाढलेल्या तुरीच्या पिकामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, वाहनचालक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. रस्त्यावर वर्दळ अधिक असताना दोन्ही बाजूंनी तुरीचे पीक वाढल्याने समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकºयांनी रस्त्याच्या कडेला पुरेशी जागा न सोडता तुरीची लागवड केल्यामुळे रस्त्याची दृश्यमानता कमी झाली आहे.
भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने याकडे गांभीयार्ने लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक कोंढा-पालोरा ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाहणी करून संबंधित शेतकºयांना रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतर राखण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच पोलीस प्रशासनानेही या समस्येची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी गावकºयांकडून करण्यात येत आहे. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
