साकोलीतील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. राजेश चंदवानी यांना मातृशोक!

दुर्गादेवी (सरलादेवी) चंदवानी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

भंडारा पत्रिका / साकोली : येथील दुर्गा किराणा दुकानाचे संचालक लखमीचंद, गुरुमुखदास, रमेश तसेच प्रसिद्ध समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व डॉ. राजेश आणि डॉ. दीपक चंदवानी यांच्या मातोश्री दुर्गादेवी (सरलादेवी) तीर्थदास चंदवानी (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चंदवानी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *