भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा: सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे ग्रंथालय सप्ताह निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात आयोजित या ग्रंथालय सप्ताहाची सुरुवात स्व. गिऱ्हे स्मृती व्याख्यानमालेने झाली. मुलांचे ‘भावविश्व’ याविषयावर सौ. प्रतिभा घुले’ भंडारा यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी हर्षल मेश्राम हे होते. व्याख्यानाचे दुसरे पुष्प डॉ. विवेक पत्की भंडारा यांनी गुंफले ^मज हृदयी सदगुरू* या विषयावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी निलकंठराव रणदिवे हे होते.
स्व. महादेवराव साठे स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्याख्यान मालेत प्रा. डॉ. अमोल पदवाड नागपूर यांनी कृत्रिम प्रज्ञा आणि भाषा ” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. श्याम डफरे होते. योग : कर्मसु कौशल्य या विषयावर योगाचार्य श्याम कुकडे भंडारा यांनी योगावर माहिती व प्रात्यक्षिक करून सुध्दादाखविले व योगाचे फायदे सुध्दा समजावून सांगितले व अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश मालगावे हे होते.
कै. पांडुरंगजी लहानुजी बागडे स्मृती प्रित्यर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता:- प्रभाव आणि परिणाम या विषयावर प्रा. डॉ. प्रशांत मानुसमारे भंडारा. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी श्रीमती शैलजा वाघ जिल्हा माहिती अधिकारी भंडारा या होत्या.
स्व. श्रीमती यशोधरा एकनाथजी रामटेके स्मृती प्रित्यर्थ :- धम्मदेशना” या विषयावर व्याख्याते – भिक्खुणी विजया मैत्रेय, लेखिका व विचारवंत नागपूर यांचे व्याख्यान झाले त्यांनी आपल्या वाणितुन विचार प्रगट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रितीताई कडव ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. विजया गजघाटे यांनी केले. कार्यक्रमाला हेमाताई सुध्दा ऊपस्थित होत्या. कै. श्रीमती मालती वसंतराव साठे स्मृती प्रित्यर्थ ‘आशिता भरतनाट्यम क्लासेस भंडारा’ नृत्य व गायनाचा कार्यक्रम सादरीकरण योषिता गराडे,शुभ्रा झोडे,स्पृहा झोडे, महिला समुह नृत्य सादरीकरण चंदा मुरकुटे, भारती जयस्वाल, आशा गिरीपुंजे भाग्यगिते प्रकाश मुरकुटे, गजानन कांबळे यांनी सुंदर असे नृत्य सादरीकरण केले.
मोहाडी येथिल सोनू ढोके,राहुल भूते,लकि राऊत यांनी सांगा मि कशी दिसते, मोगरा फुलला या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादरीकरण केले. नृत्य-संगीत आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते.
संपूर्ण व्याख्यानमालेचे सूत्र संचालन प्रा. नरेश आंबिलकर, हर्षल मेश्राम व आभार प्रदर्शन हर्षल मेश्राम , डॉ. प्रकाश मालगावे,श्रीमती मंगला भोले यांनी केले.
ग्रंथालय सप्ताह व्याख्यान मालेला कार्यकारी मंडळ्चे अविनाश पाठक, शेखर गभने,नितीन रासेगायकर,निलकंठराव रणदिव, प्रा. गुरुप्रसाद पाखमोडे ‘ धनंजय ढगे, आशिष दलाल , मदन बागडे, प्रितीताई कडव , मंगला निंबार्ते, चांदे सर, धनंजय मोहकर, मोहकर सर , नितीन गायधनी व इतर सदस्य व सभासद वर्ग उपस्थित होते.
या व्याख्यान मालेच्या यशस्वीते साठी ग्रंथपाल घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, दिनेश हरडे , सुधीर खोब्रागडे, युवराज साठवणे, मारोती वाघमारे यांनी अथक परीश्रम घेतले.
