दिघोरी मोठी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच गायब; रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवेच्या नियोजनावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सायंकाळच्या वेळी उपचारासाठी आरोग्य केंद्रात पोहोचलेल्या रुग्णांना तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही डॉक्टर अथवा संबंधित कर्मचारी उपस्थित न मिळाल्याने अखेर उपचाराविनाच घरी परतावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून दवाखान्यात येणाºया रुग्णांनाच जर उपचारासाठी वणवण भटकावे लागत असेल, तर ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा नेमका उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून, आजूबाजूच्या गावांतील नागरिकही उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतात. विशेषत: सायंकाळच्या वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास किंवा तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास ग्रामीण रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र हा मोठा आधार असतो.

मात्र, याच वेळेत डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी उपचारासाठी नेमके कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण होतो.मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास काही रुग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. तब्बल अर्धा तास वाट पाहूनही उपचाराची व्यवस्था न झाल्याने रुग्णांना अखेर रिकाम्या हाताने परतावेलागले. शासनाकडून डॉक्टर आणि कर्मचाºयांना नियमित वेतन दिले जाते, आरोग्य केंद्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; मग ऐन गरजेच्या वेळी रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणा कुठे असते, असा सवाल उपस्थित होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *