साकोली येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल येथे आजी-आजोबा दिवस साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल (एकोडी रोड) येथे दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी नानानानी दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक जी. एच.ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका संचिता ब्रह्मचारी, संजय लांजेवार, विकास येरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता शारदा मातेच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधुन पुर्व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी नाना नानी दिना प्रसंगी विविध नृत्य,गितगायन आणि आपल्या नाना नानी चे परिचय करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. आजी,आजोबा पालकांची संगित खुर्ची स्पर्धा घेवुन अमिता साखरे , वर्षा कापगते ह्यांनी कार्यक्रमात रंजकता आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल नंदेश्वर,धनराज मेश्राम, सचिन मारवाडे, निखिल निबेंकर, सशिर वालोदे सारीका ठाकरे, निशा रामटेके नंदा कापगते, मृणाली कोसे, वैशाली मारवाडे,श्रुणाली, जंवजाळ, शिरीन शेख,ममता सरोदे, लता कटरे, शिवाली गुप्ता, दिक्षा गेडाम, विजया पडोळे, अर्चना मारवाडे,पुनम वाडीभस्मे, पुष्पलता आसलवार, मालती इरले प्रिती धुर्वे ह्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन कु. शिवाली गुप्ता, जान्हवी चंदवानी ह्यानी केले. तर आभार प्रदर्शन कुपाली राऊत ह्यानी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *