कटंगी प्रकल्पामुळे पिंडकेपार गावाचे अस्तित्व धोक्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगाव तालुक्यातील कटंगी मध्यम प्रकल्पाच्या जलाशयातील पाण्यामुळे पिंडकेपार गाव दलदलीत अडकले आहे. घरांच्या भिंती ओल्या पडल्याने घरांची पडझड होत आहे. त्याचबरोबर अनेक घरांच्या भिंतीना ओल आल्यामुळे घर कधीही जमीनदोस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलाशयातील पाण्यामुळे भूजल पातळी वाढल्याने पिंडकेपार गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की १५ जानेवारी १९८३ रोजी कटंगी मध्यम प्रकल्प जलाशयाच्या बांधकामासाठी मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया यांनी अधिसूचना जारी केली होती. १९९० मध्ये बांधकाम सुरू झाले. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पिंडकेपार गावातील शेतकºयांची १२३.२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. अशा प्रकारे पाथरी गावातील शेतकºयांची १३२.१५ हेक्टर आणि कटंगी गावातील शेतकºयांची ११.०१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. जलाशयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, या जलाशयाच्या पाण्याने जिल्ह्यातील २ हजार ४५३ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होत आहे. शेतकºयांना कमी भावात मोबदला देऊन जमिनीचे संपादन केल्या गेले. त्यामूळे शेतकरी भूमिहीन होऊन प्रकल्पग्रस्त झाले आहेत. ज्या शेतकºयांची आर्थिक स्थिती मजबूत होती, त्या शेतकºयांनी इतर ठिकाणी शेती खरेदी केली, परंतु प्रकल्पग्रस्तांपैकी ९० टक्के शेतकºयांनी जमीन खरेदी केली नाही, ते अजूनही भूमिहीन आहेत.

नोकºयाांअभावी प्रकल्पग्रस्त बेरोजगार झाले आहेत. मात्र आता गेल्या तीन ते चार वर्षांपासून या जलाशयाच्या पाण्यापासून नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या समस्येमुळे गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कटंगी प्रकल्पातील पाण्यामुळे पिंडकेपार गावाच् भूजल पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिंडकेपार गावाला दल दलचे स्वरूप आले आहे. घरांच्या भिंतीना ३ ते ४ फुटांपर्यंत ओल आले आहे. त्यामुळे घरे सरळ खाली पडत आहेत. तर अनेक कोसळण्याच्या वाटेवर आहेत त्यामूळे, पीडितांनी त्या घरांमध्ये राहणे सोडले आहे. तर अनेक गावकरी दुसºयाच्या घरात राहत आहेत तेवढेच नव्हे तर अनेकांनी गाव पण सोडले आहे.गावातील निम्म्याहून अधिक घरे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे गावात दलदल निर्माण झाल्याने गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुनर्वसन योजनेंतर्गत गावातच नवीन घरे बांधण्यासाठी अनुदानाची रक्कम द्यावी, जेणेकरून गावाचे अस्तित्व वाचून ग्रामस्थ या धोक्यातून मुक्त होतील, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *