देव्हाडा येथील आवारभिंत बांधकामात गैरप्रकार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीचे हद्दीत लेखाशीर्ष मलभुत सुविधा अंतर्गत साईबाबा देवस्थान येथे आवार भिंतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु येथिल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकाºयांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न देता सदर मनमर्जीने बांधकाम करण्यात आले. तरी सदर नियमबाह्य बांधकाम व ईतर कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देव्हाडा बु. येथील प्रभारी सरपंच भाऊराव लाळे यांनी आयोजित वार्ताहर परिषदेतुन केली आहे. मोहाडी तालुक्यातील नदीकाठावर वसलेल्या देव्हाडा बुज. येथील सार्वजनिक जागेवर लेखाशीर्ष मुलभुत सुविधा अंतर्गत साईबाबा देवस्थान येथे आवार भिंत मंजूर करताना गट क्र ९६.९८ या गटांचा उल्लेख आले. तांत्रिक मंजुरीत ९८९ या गटक्रमांकाचे उल्लेख आहे. बांधकाम देव्हाडा ग्रामपंचायतला लावण्यात आले. मात्र, येथिल सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांना बांधकामाची माहिती दिली नाही. ग्रामसेवकांनी मर्जीतील सदस्यांना विश्वासात घेऊन प्रोसेडिंग लिहून घेतली.

बांधकाम व साहित्य पुरवठा कुणी केला, याची माहिती सरपंचांना देखिल नाही. ग्रामपंचायत काम करीत असल्यास सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक आहे. मात्र, सरपंचाची स्वाक्षरी नाही. ग्रामपंचायतीने पुरवठा धारकास आदेश दिला नसताना साहित्य पुरवठा कुणी केला?, तसेच काम जर ग्रामपंचायत करत असेल तर कामाचा इन्शुरन्स ग्रामपंचायतने भरला का? बांधकामाचे इन्शुरन्स ग्रामपंचायतीने भरले नाहीत, तर कुणी व का भरले, जर ग्रामसेवकांने भरले असतील तर सरपंचांना का सांगितले नाही? ग्रामपंचायत फंडातून पैसे न काढता परस्पर का भरण्यात आले. याची चौकशी होणे गरजेचे आहे. आवार भिंतीची मंजुरी एका गटाची, तर बांधकाम दुसºया गटात कसे करण्यात आले. सदर कार्यरंभ आदेश झाल्यानंतर कागदपत्रे तपासण्यातआले नाहीत. असे अनेक प्रश्न येथे उपस्थित होत आहे तरी सदर प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी सरपंच भाऊराळ लाळे यांनी रविवार दि.६ नोव्हेंबर २०२२ ला दुपारी २ वाजता वार्ताहरपरिषदेतुन केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *