बँक आवारात पैसे मोजत असलेल्या ग्राहकाचे पैसे हिसकावून पळणाºया आरोपीला लोकांनी दिला चोप…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- बैंक आवारात काढलेले पैसे मोजत असलेल्या वृद्ध ग्राहकाचे पैसे हिसकावून पळणाºया आरोपी च्या माजी जिल्हा परिषद सदस्य राजू चांदेवार व बँकेतील सुरक्षा गार्ड याने फिल्मी स्टाइल पाठलाग करुण पडत असलेल्या चोराला ताब्यात घेतल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरीच्या स्टेट बैंक परिसरात घडली असून पकडल्यानंतर संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आहे. दरम्यान आरोपी चोराकड़ून चोरलेले ४० हजार रुपये परत मिळवून संबधित वृद्ध व्यक्तीला परत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव इमरान खान असे असून त्याला देवरी पोलिसांकड़े सुपुर्द करण्यात आले आहे. आज दुपारच्या १२ ते १ च्या दरम्यान देवरी येथील भारतीय स्टेट बैंक येथे एक वृद्ध बँकेतून खात्यातून ४० हजार रुपये काढले असुन बँकेत असणाºया एका अज्ञात वैक्तीने त्या वृदाला पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले व बँकेतून पळ काढला, त्या वृद्धने आरडा ओरडा बँकेत असणाºया माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार व बँकेतील सुरक्षा गार्ड चोराचा पाठलाग करत देवरी येथील चिचगड रोड वरील चौकात त्या चोराला पकडण्यात असुन परिसरातील लोक सुद्धा त्या चौकात जमा झाले व प्रकरण माहिती होताच त्या चोराला चांगला चोप दिला. असुन याची माहिती देवरी पोलिसांना देण्यात अली असुन पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत चोराला ताब्यात घेतले असुन चोर लेले पैसे त्या वृद्धाला परत केले असुन चोरला पोलीस देवरी येथे नेण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.