खापा चौकात अपघाताचे सत्र सुरूच

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील खापा परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.किशोर तुकाराम तितिरमारे रा.काटेबाम्हणी असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. खापा चौकात मोठया प्रमाणात अपघात होत असुन हे मृत्यूचे केंद्र बनले आहे. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जखमी किशोर तितिरमारे हे त्यांच्या मोपेट दुचाकी क्र.एम.एच. ३६/८६३३ ने जात असतांना खापा चौकात ट्रक क्रमांक एमएच ४० ं/१०१० ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीचालक किशोर तितिरमारे हे जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय तुममस येथेनेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरीता भंडारा येथे हलविण्यात आले आहे. तुमसर इथुन काही अंतरावर असलेले खापा चौक हे मुख्य चौक असुन या चौकातुन गोंदिया नागपूर राज्यमार्ग जातो. या मागार्ने मोठया प्रमाणात वाहनांचे आवागमन सुरू असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील आठ ते दहा दिवसा अगोदर याच ठिकाणी ट्रक आणि मोटरसायकल मध्ये अपघात झाला होता. वारंवार होणाºया अपघातामुळे अनेकांचे प्राण गेले आहे तर अनेकांना अपंगत्व आले .त्यामुळे हा चौक आणखी किती अपघाताचा साक्षीदार ठरणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.