भंडारा-पवनीमध्ये होणार एमआयडीसीचा विस्तार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा – पवनी तालुक्यात उद्योग उभारून बेरोजगारीवर मात करण्यासाठी भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव एम आय डी सीत २०० एकर जागा वाढविणे,पवनी तालुका एम आय डी सी त १५ हेक्टर जागा वाढविणे व पितळ उद्योगाला चालना देण्यासाठी क्लस्टर उभारणे हे महत्त्वपूर्ण ३ निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज उद्योग भवनात घेतलेल्या बैठकीत घेण्यात आले.आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बैठक घेतली.पवनी एम आय डी सी त १० हेक्टर जागा असून अनेक मोठे उद्योग यावेत याकरिता १५ हेक्टर वाढविण्यात येणार आहे.जुनी १० व वाढीव १५ अशी एकूण २५ हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. भंडारा तालुक्यात रजेदहेगाव येथील एम आय डी सी त असलेल्या जागेत २०० एकर जागा वाढवून पितळ उद्योगाला चालना मिळवून देन्याक-ि रता क्लस्टर उभारण्याचा निर्धार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुना उद्योग असलेल्या पितळ उद्योगाला राजाश्रय मिळावा ,येथे काम करणारे उद्योजक,कामगार याना रोजगार प्राप्त व्हावा याकरिता जवाहर नगर ते मौदा यादरम्यान पितळ उद्योग हब उभरण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. हिवाळी अधिवेशन आटोपल्या नंतर उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे या संबंधी आढावा घेणार आहेत. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तातडीने अमालबजावणी करण्याचे निर्देश यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबधित अधिकाºयांना दिलेत . या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत,आमदार नरेंद्र भोंडेकर,उद्योग विभाग सचिव हर्षदीप कांबळे,एम आय डी सी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तलमले,उद्योजक पंकज सारडा, अभय भागवत आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *