मनुष्यहानी, शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत मिळाली भरपाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील विविध भागात झालेल्या मनुष्यहानी, शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत विविध प्रकरणांत पिडीत कुटुंबियांना नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली. ही भरपाई स्थानिक लाखांदूर येथील वन विभागाकडून पिडीतांच्या कुटुंबियांना २८ फेब्रुवारी रोजी देण्यात आली. या भरपाई अंतर्गत तब्बल ३० लाख ६२ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सविस्तर असे की, सन २०२२ –२०२३ मध्ये लाखांदूर तालुक्यातील काही भाग जंगलव्याप्त असुन यात विविध वन्य प्राणी आहेत. मागील वर्षात या वन्यप्राण्यांकडून मनुष्य व प्राणी संघर्ष होऊन तालुक्यात मनुष्यहानी, शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत विविध घटना घडल्या होत्या. त्यापैकी तब्बल ३६ प्रकरणांमध्ये पिडीतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली.

मनुष्यहानी अंतर्गत तालुक्यातील विविध भागांत ५ प्रकरणे होती. यात एका ईसमाचा उपचारादरम्यान पैकी १ मृत्यु प्रकरण तर ४ जख्मी होते. यात २९ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मालकी दुचाकीने शेतशिवारात जात असताना रानडुकराने दुचाकीला धडक दिल्याने पिंपळगाव/को. येथील किशोर सदाशिव नाकाडे गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान (ता. १ नोव्हेंबर) मृत्यू झाला. तर दांडेगाव येथील सुरेश सिताराम घोरपडे, सोनी येथील जयदेव शामराव देशमुख, चिचगाव येथील शंकर अब्रू गहाणे व भागडी येथील आबाजी हरी मिसार हे विविध घटनेत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. पिडीत कुटुंबियांना लाखांदूर वनविभागाकडुन धनादेश वितरीत करतांना लाखांदूरचे वनपरीक्षेञाधिकारी रुपेश गावित, वनरक्षक जि. डी. हत्थे, बि. एस. पाटील, एस. जी. नरवाडे, एस. जी. खंडागळे, आर. ए. मेश्राम, लिपीक एन. आर. बोरकर, वाहनचालक प्रफुल राऊत व सामाजीक कार्यकर्ता पप्पु मातेरे यांसह अन्य वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मृत्यु झाला तर ४ ईसम गंभीररीत्या जखमी झाले होते. विविध वन्य प्राण्यांनी तालुक्यातील जवळपास १९ ठिकाणी शेतपिकांची हानी केली होती तर पशुहानी अंतर्गत १२ प्रकरणे घडली होती. एकुणच मनुष्यहानी, शेतपिकहानी व पशुहानी अंतर्गत ३६ प्रकरणे घडली होती. या नुकसानी अंतर्गत पिडीतांच्या कुटुंबियांनी शासनाकडुन नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानुसार लाखांदूर वनविभागाचे वनपरीक्षेञाधिकारी रुपेश गावित यांनी विविध प्रकरणांचा पंचनामा करुन पिडीतांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली होती. त्यानुसार तब्बल ३६ प्रकरणांसाठी ३० लाख ६२ हजार रुपये मंजुर करण्यात आले. यामध्ये मनुष्यहानी अंर्तगत २६ लाख ६५ हजार, शेतपीकहानी अंतर्गत १ लाख ९१ हजार व पशुहानी अंतर्गत २ लाख ६ हजार रुपये मंजुर करण्यात आले. दरम्यान, मनुष्यहानी प्रकरणातील ५ प्रकरणा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.