नेरला उपसा सिंचनमुळे हरितक्रांतीच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसीखुर्द धरणाची संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना तब्बल ४० वर्षानंतर जवळपास पूर्ण झाली असून, अधिकाºयांनी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडलं आहे. सोडलेलं पाणी ५० किमी लांब असलेल्या अंतिम गावापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चार दशकानंतर दारी पोहोचलेल्या पाण्यामुळे सुखावले आहेत. यामुळे पंचक्रोशीतील शेतकºयांना सुखावणारी बाब म्हणजे, यावर्षी नेरला उपसा सिंचन खाली असलेल्या शेतकºयांनी उन्हाळी धानपिकाची लागवड याच उपसा सिंचनाच्या भरवशावर लावलेले आहेत. तब्बल ४ दशकापुर्वीपासून निर्माण कार्य सुरु असलेला भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण लवकरच पूर्ण होणार आहे.
गोसीखुर्द संदर्भातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. गोसीखुर्द धरणाची पायाभरणी १९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते झाली होती. तर प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात ही २२ एप्रिल १९८८ मध्ये झाली होती. या धरणाची सुरुवातीची किंमत ही ३८८ कोटी रुपये होती. तर धरणाची आताची किंमत ही २० हजार कोटी रुपये आहे. ओलिताखाली येणारं क्षेत्र हे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर एवढं आहे. नेरला उपसा सिंचन योजना ही गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत येणारी एक उपसा सिंचन योजना आहे. या योजनेद्वारे भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा या भागातील शेतकºयांना मोठा फायदा होणार असून, येथील बागायती शेती होणार आहे. ही योजना वैनगंगेच्या किनाºयावर नेरला या गावाजवळ उभारण्यात आली आहे. ही विदर्भातील सर्वात मोठी उपसा जल सिंचन योजना आहे.
नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकºयांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला होता. कारण या भागात पाण्याची टंचाई होती. शेतकºयांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती. त्यामुळे शेतकºयांना सातत्याने फटका बसत होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना मोठा लाभ होणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *