प्रगतशील शेतकºयाची टमाटरची बाग वादळात क्षतिग्रस्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर पांढराबोडी : १८ व १९ मार्च २०२३ रोजी बरसलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपीटच्या तडाख्यामुळे मोहाडी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांच्या शेतातील टमाटर पिकाची संपूर्ण बाग जमिनीवर कोसळून क्षतिग्रस्त झाली असून लाखो रुपयांचा फटका बसला असल्याने ते आर्थिक संकटात सापडल्याने चिंतातुर, वैफल्यग्रस्त झाले आहेत. आता वादळात क्षतीग्रस्त झालेल्या टमाटर पिकाला जीवदान कसे द्यावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा ठाकला असून त्यांची केविलवाणी स्थिती झाली असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन वादळात नुकसान झालेल्या टमाटर पिकाची प्रत्यक्ष मोका पाहणीसह पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मोहाडी तालुक्यातील हरदोली (झंझाड) येथील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांनी नोकरीची वाट न बघता कृषी विषयक आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान अवगत करून शेतात विविध प्रयोग करण्याचा आणि त्यातून भरपूर उत्पादन घेण्याचा कृती संकल्प केला असून ते शेतात विविध वाणाच्या पिकांची लागवड करून शेती करतात. मागील काही वर्षात शेतात भेंडी, लवकी,मिरची पिकांची लागवड करून योग्य मशागत केली आणि भरपूर उत्पादन घेतले. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला विदेशात मागणी आहे. त्यामुळे यावर्षी शेतात टमाटर या पिकाची लागवड केली. पिकाची वाढ चांगली व्हावी यासाठी सिंचन व खताची मात्रा, निंदन तसेच बांबूच्या साहाय्याने पिकाच्या वाढीसाठी आधार दिला.

पीक चांगले होती आणि टमाटर ही लागले होते. परंतु १८ व १९ मार्च २०२३ रोजी निसर्गाच्या अवकृपेमुळे मेघगर्जनेसह अवकाळी वादळी पाऊस व गारपीटचा वर्षाव झाल्याने वादळाने टमाटर चे उभे असलेले पीक शेतात जमिनीवर कोसळून क्षतिग्रस्त झाले आहे. त्यामुळे आता लागवडीचा खर्च ही निघणे कठीण झाले असून सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून केविलवाणी स्थिती झाली असल्याने ते चिंतातुर, व वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागली आहे. याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील प्रगतशील शेतकरी सेवक झंझाड यांच्या शेतातील टमाटर पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष मोका पाहणीसह पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत करा- सुभाष तितीरमारे

पांढराबोडी : मोहाडी तालुक्यात १८ व १९ मार्च २०२३ रोजी निसर्गाच्या अवकृपेमुळे मेघगर्जनेसह वादळी वाºयासह पाऊस आणि गारपीटचा वर्षाव झाल्याने शेतातील रब्बी पिकांचे तसेच काही नागरिकांच्या कौलारू घर व झोपड्यांचे नुकसान झाले असून तालुका प्रशासनाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी व मोका पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी अकोला टोला ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाष तितीरमारे यांनी केली आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी शेतात गहू, हरभरा, मोवरी यासारख्या इतर पिकांची लागवड केली होती.

पीक परिपक्व होऊन कापणी करण्याच्या मार्गावर असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे मेघगर्जनेसह वादळी वाºयासह पाऊस आणि गारपीट पडल्याने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाल्याने ते चिंतातुर झाले आहेत. याबाबत मोहाडी तालुक्यातील कृषी विभागाच्या सबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन शेतकरी बांधवांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे प्रत्यक्ष मोका पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी अकोला टोला ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुभाष तितीरमारे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *