मौदी भातहांडी येथील मंदिरात पुजापाठ करण्यासाठी प्रशासनाचा मज्जाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील (श्रीक्षेत्र आंभोरा) मौदी भातहांडी वैनगंगा नदीच्या काठावर प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर आहे. दि. ६ एप्रिल ला हनुमान जयंती असल्यामुळे मंदीराचे पुजारी मधुकर सोनटक्के मंदीराची साफसफाई करण्यासाठी जात असताना त्याला अड्याळ पोलीसांनी रोखुन मंदिरात जाण्यापासून मज्जाव केला. व पोलीस गाडीत बसवून पहेला येथे सोडून दिले. ह्या प्रकाराने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासच ऐन सणासुदीच्या काळात धार्मिक उन्माद पासरवतोय की काय? असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण झाला आहे.
सध्या ह्या मंदीराचे चारही बाजुने गोसे खुर्द धरणाचे पाणी साचले आहे. ह्या अगोदर मंदीर परीसरात हजारो लोकांची यात्रा भरायची. आता पाणी असल्यामुळे लोकांची वर्दळ कमी झाली आहे. मंदीरालगतच पुलाचे बांधकाम सुरु आहे. परंतु मंदिरात जाण्यासाठी रस्ताबनवला नाही. त्यामुळे मंदीरात नावेने जावे लागते. ह्याच नदीपात्रातुन दररोज अड्याळ पोलीसांच्या आशिर्वादाने पैसै घेऊन मासेमारी करणाºया बोटीने दोनशे ते तीनशे अवैध प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने मौदी ते आंभोरा जाणाºया प्रवाशांची तात्काळ व्यवस्था करावी. नाही तर दररोज पाचशेच्या वर प्रवासी प्रवास करताना मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही, याची खबरदारी घ्यावी. त्याच प्रमाणे मंदीरात पुजापाठ करण्यासाठी रोखणाºया प्रशासनाने मंदीराची देखभाल पुजापाठ आपल्या यंत्रणे मार्फत करावी. अन्यथा प्रशासन निषेध करून आंदोलन करण्यात येईल.
आंदोलना दरम्यान धार्मिक सलोखा बिघडल्यास ह्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा सुभाष आजबले, पुजा ठवकर, प्रविण उदापुरे, बालु ठवकर, स्वप्नील आरीकर यांनी दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.