सर्पमित्रांनी पकडला सापाचा जोडा, बरणीतच दिले अंडे

सिहोरा : घरपरिसरात निघालेल्या नर-मादा सापाच्या जोडीला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. विशेष म्हणजे काही वेळातच मादीने तब्बल ३० अंडे दिले. सदर जोडीला चुल्हाड येथून पकडून चांदपूरच्या जंगलात सोडण्यात आले. तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथील रहिवासी सुखदेव राउत यांच्या घरी दोन सापाचा जोडा दिसून आला. याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. यावेळी सर्पमित्रा शुभम तुमसरे, लक्ष्मण खडसन व रोहित नान्हे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून सापाच्या जोडीला ताब्यात घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.