तेंदूपत्ता संकलन करणाºया मजुरांना भरघोस बोनस मंजूर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तेंदूपत्ता संकलन करणाºया मजुरांनी गोळा केलेल्या पानानुसार रॉयल्टीच्या रकमेतून १०० टक्के बोनस दिला जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने २०२२ मध्ये केली होती. यापूर्वी रॉयल्टीच्या रकमेतून वनविभाग प्रशासकीय खर्च वजा करून उर्वरित रक्कम बोनस म्हणून वितरित करीत असे. लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दोन तेंदू युनिट असून त्यात २५ गावांमधून तेंदूपत्ता संकलनाचे काम केले जाते. मागील वर्षी संकलन केलेल्या २ हजार १४५ संकलन करणाºया कुटुंबास एकूण १ कोटी १४ लाख ८३ हजार ९९ ८ रुपये बोनसचे वाटप करण्यात आले आहे.

यात पिंपळगाव /को . व जैतपूर युनिट मध्ये १ हजार १८० संकलन करणाºया कुटुंबास ६५ लाख ९ १ हजार ९९९ तर दिघोरी/पारडी युनिटमध्ये ९ ६५ संकलन करणाºया कुटुंबास ४८ लाख ९ १ हजार ९९९ रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यंदा आलेल्या अवकाळी पावसामुळे तेंदू हंगाम काहीसा उशिरा सुरू होत आहे. जंगल क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगल क्षेत्रात समूहाने जाणे तसेच सूर्योदयाच्या आधी व सूर्यास्तानंतर जंगल क्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *