वैनगंगेत उडी घेऊन तरुणाची अआत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या हरदोली (सि) येथील तरुणाने वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १७ मे रोजी उघडकीस आली असून योगेंद्र नंदलाल बोपचे वय १५ वर्षे असे आत्महत्या करणाºया तरुणाचे नाव आहे . सिहोरा आणी तिरोडाच्या मध्यभागी वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कवलेवाडा डॅम येथे १५ मे रोजी या तरुणाने उडी घेतल्याचे समजते. काल १६ मे रोजी दिवसभर त्या तरुणाचा शोध घेण्यात आला परंतु कुठेही शोध लागला नाही.अखेर आज १७ मे रोजी वैनगंगा नदीवरील कवलेवाडा डॅम येथे तरुण योगेंद्र बोपचे याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसल्याचे सांगितले जाते . घटनेचे वृत्त कळताच सिहोरा ठाणेदार निलेश गोसावी हे आपल्या पोलीस ताμयासह घटना स्थळावर दाखल झाले. पंचनामा करून शव विच्छेदनासाठी तुमसरला पाठविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.