जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ह्यांच्या बद्दल राष्ट—वादीचे माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमानास्पद ट्वीट करून समस्त महिला वगार्चा अपमान केला. याबद्दल भाजपा महिला मोर्चा भंडारा जिल्हा तर्फे आव्हाड यांच्या विकृत मनोवृत्तीचा निषेध नोंदविण्यात आला. प्रसंगी आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन भंडारा पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक बारसागडे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष माला बगमारे, जिल्हा महामंत्री मंजिरी पनवेलकर, व्यापारी आघाडी प्रमुख अर्चना श्रीवास्तव, माजी नगरसेविका साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, आशा उईके उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *