जीपीएफ योजनेच्या पावत्या मिळणार तरी कधी ?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : कर्मचाºयांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी योजना व डीसीपीएस रक्कम कपात करण्यात आली. त्याचा हिशेब वेतन पथकाला द्यावा लागतो. तथापि दोन वषार्पासून जीपीएफ व डीसीपीएस योजनेच्या पावत्या देण्यात आल्या नाहीत. या दोन्ही योजनेच्या आॅनलाइन / आॅफलाइन पावत्या कर्मचाºयांना देण्यात याव्यात अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी योजना व पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत देण्यात येणाºया पावत्या २०२१ २२ पासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना अजून प्राप्त झाल्या नाहीत.

या बाबत वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) भंडारा यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकभविष्य निर्वाह निधी योजनेच्या पावत्या आॅनलाइन झाल्या आहेत. पण ,अजून त्या पावत्या शालार्थ ला अपडेट करण्यात आले नाही. शालार्थ प्रणालीचे काम सुरू आहे. त्यामुळे पावत्या मिळण्यास विलंब होत आहे असे भंडारा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयाकडून सांगण्यात आले. संचालक पुणे यांना ७ जानेवारी २०२३ पत्र पाठवले.

त्या पत्रात , २०२१-२०२२ पासून भविष्य निर्वाह निधी पावत्या आॅनलाईन तयार होणार आहेत. वेतन पथक व भविष्य निधी पथक कार्यालय भंडारा कार्यालयाच्या स्तरावर आॅनलाईन पावत्या तयार करताना बरेच शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाºयांचे एप्रिल२०२१ व मे-२०२१ च्या भविष्य निर्वाह निधी कपाती दिसत नाहीत.त्यामुळे आॅनलाईन पावत्या जनरेट करण्यासअडचणी निर्माण होत आहेत.पूर्वीप्रमाणेच सन २०२१-२०२२ च्या पावत्या आॅफलाईन तयार करुन वाटप करायचे काय अशी विचारणा केली आहे. वेतन पथक कार्यालय व संचालक , माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्यात पत्रव्यवहार होत असला तरी भविष्य निर्वाह निधी योजना व पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत देण्यात येणाºया पावत्या देण्याचा तिढा काही सुटेना.

त्यामुळे , कर्मचाºयांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी योजना व पारिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजनेत कपात झाल्याचा हिशेब देण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे ,सचिव राजू बांते ,रेखा भेंडारकर , प्रमोद धार्मिक ,विष्णूदास जगनाडे , अर्चना बावणे , सुनीता तोडकर ,वीपीन रायपूरकर ,कुंदा गोडबोले आदींनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *