फडणवीसांनी जाहीर केला घरकूलचा उर्वरित निधी!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नगर परिषद तुमसर अंतर्गत शहरी आवास योजनेतून तब्बल ५०० हून अधिक गरजू लाभार्थ्यांना घरकुलचा थेट लाभ मिळाला होता. तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विविध स्तरावर सर्वे करून लाभार्थ्यांची यादी मंजूर करून घेतली होती. मात्र मधल्या काळात केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या निधीचे विनियोग प्रमाणपत्र गृह निर्माण विभागाला नगर परिषद तुमसर प्रशासनाने वेळीच जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे एकूण लाभार्थ्यांपैकी दुसºया यादीतील १५० हून अधिक कुटुंबांना आर्थिक परिस्थितींना तोंड द्यावे लागले होते.

मात्र सत्ता विसर्जन होऊन देखील पडोळे यांनी स्थानिकांच्या समस्यांची कास धरून राज्य सरकारकडे वारंवार व्यक्तिश: मुंबई येथे पाठपुरावा केला. तर एकूण २.५० लक्ष रूपयांपैकी पहिल्या यातीतील लाभार्थ्यांचे २.२० लक्ष रुपये देय झाले. त्याचेच स्वरूप म्हणून राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल योजनेच्या दुसºया यादीतील लाभार्थ्यांचे ६० हजार रुपयांचा आर्थिक टप्पा नुकताच जाहीर केला. त्यातूनच तुमसर पालिकेच्या खात्यात ४ आॅगस्टला योजनेचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रशासक राजवटीत तातपळत बसलेला प्रत्येक घरकुल लाभार्थी सुखावला आहे. येथे लवकरच तो निधी प्रती लाभार्थी याप्रमाणे थेट बँक खात्यातून तसेच धनादेशाचे स्वरूपात वाटप केला जाणार आहे. याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता घरकुल योजना हाताळणारे अभियंता पडोळे यांच्याशी संपर्क केला असता, त्याच संदर्भात ते मुंबईला असल्याची माहिती मिळाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *