चुलबंद वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुरात आंघोळीसाठी उतरलेला एक इसम पुरात वाहून गेल्याने बेपत्ता होता. त्या इसमाचा चुलबंद नदीपात्रात मृतदेह आढळला. ही घटना १७ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील चुलबंद नदीपाञात उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन शेंडे (५५) रा. भागडी असे आहे. १५ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गजानन चुलबंद नदीच्या पुरात आंघोळ करण्याचा बहाण्याने उतरला. गजाननला पोहता येत असल्याने उपस्थितांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले त्यावेळी तो पुरात वाहून गेला. घटनेला एक दिवस लोटत असतांनाच पत्ता न लागल्याने त्याचा डुबून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रजय चुटे, पोलीस अंमलदार कापगते यांनी घटनास्थळी पोहचत तपासकार्य सुरू केले. तब्बल २ दिवसानंतर जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर गजाननाचा मृतदेह नदी पत्रात आढळला. ठाणेदार कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमेश शिवणकर, प्रमोद टेकाम, रवींद्र मुंजमकर व वाहन चालक जितेंद्र खरकाटे यांनी घटनास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *