वडीलांच्या चौदावी कार्यक्रमाच्या दुसºया दिवशी मुलाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा : पंधरा दिवसा अगोदर झालेल्या वडिलांच्या मृत्यूचा चौदावी चा कार्यक्रम आटोपुन दुसºयाच दिवशी मुलाने गावाशेजारील तलावात उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास विहिरगाव येथे उघडकीस आली. रंजीत विजयपाल वासनिक वय २२ वर्ष रा. विहिरगाव असे आत्महत्या करणाºया तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादातुन त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती गावात पसरतात विरगाव येथील पोलीस पाटील भावना मोहतुरे यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांना घटनास्थळावर मृतकाचे मोबाईल व टी-शर्ट आढळली होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला की तरूणाने आत्महत्या केली असावी त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासचक्र फिरवले. तलावातील मृतदेह शोधण्याकरिता तालुका प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नव्हतीत्यामुळे तालुका प्रशासनाविरोधात गावकºयांमध्ये रोष निर्माण झाला होता परंतु डोंगरगाव जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे यांनी स्वत: गावातील श्यामू बोंद्रे मोहन मोहनकर व मंगेश मोहतुरे यांच्या सहाय्याने तलावात उडी घेऊन खोलपर्यंत शोध घेतला असता अखेर मृतदेह शोधण्यात त्यांना यश आहे. रंजीतच्या मृत्यूमुळे आईवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.