जिल्ह्यात विघ्नहर्ता बाप्पाचे जल्लोषात स्वागत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे भक्तीभावात, आनंदात व जल्लोषात आगमन झाले. सार्वजनिक मंडळासह व प्रत्येक घरात गणरायाची विधीवत पूजा, अर्चना करुन श्रीमूर्तीची स्थापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाची मागील पंधरा दिवसापासून जिल्ह्यातउत्साहात तयारी सुरु होती. आज, १९ ़सप्टेंबर रोजी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात श्रीमूतीर्चे भक्तीभावाने पुजन करुन स्थापना करण्यात आली. लहानापासून जेष्ठापर्यंत या उत्सवाचा उत्साह दिसून आाला. दरम्यान आज सकाळपासूनच बाजारपेठेत व मूर्तीचाळीत लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मुर्तीसह साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. येथील जयस्तंभ चौक ते नेहरु चौक मार्गावर असलेल्या श्रीच्या लहानमूतीर्ची दुकानात भाविकांनी एकच गर्दी केली होती.

बाप्पांना आपल्या घरी व मंडळाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सर्वांनी अगदी नाचत व वाजत गाजत जल्लोष साजरा केला. जिल्ह्यात ६७३ सार्वजानिक गणपती, ३९५ गावांत एक गाव एक गणपती व ५४७१ घरात बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाचा १० दिवसाचा मुक्काम राहणार असून, या दरम्यान गणेश मंडळांनी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उत्सवादरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस विभागही सज्ज झाले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.