महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना नव संशोधनासाठी पेटेंट

नागपूर : महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिअ‍ॅक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरील नाविण्यपूर्ण संशोधनाला पेटेंट प्राप्त झाले असून यापूर्वी त्यांचा नाविण्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारने पेटेंट प्राप्त झाले आहे. स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिअ‍ॅक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरचे नाविण्यपूर्ण संशोधन कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल व विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट आॅफटेकनॉलॉजी येथील डॉ. मकरंद बल्लाळ यांनी सादर केले होते. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने२३ आॅक्टोबर २०२३ ला पेटेंट प्रदान केले आहे.

डॉ. गजानन जयस्वाल यांचे कंडिशन मॉनिटरिंग अँड हेल्थ स्टेटस असेसमेंट आॅफ ट्रान्सफॉर्मर या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रकाशकाने पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच यापूर्वी डॉ. गजानन जयस्वाल व डॉ. मकरंद बल्लाळ यांनी रिमोट कंडिशन मॉनिटरिंग सिस्टिम फॉरडिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर या विषयावरील संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाने २०२० मध्ये पेटेंट प्रदान केले आहे. नव्या या संशोधनामुळे ट्रान्सफॉर्मर व रिअ‍ॅक्टरच्या हेल्थ स्टेटस ची माहिती आधीच प्राप्त करता येणे शक्य होणार आहे. या संशोधनासाठी डॉ. गजानन जयस्वाल यांना डॉ. मकरंद बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,गोंदिया परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी गजानन जयस्वाल यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.