शेतकºयानी नसगिक शेतीकड वळाव – जिल्हाधिकारी कभेजकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विषमुक्त अन्न, प्रदुषण विरहित जमिन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक सेंद्रिय शेती हाच पर्याय आहे हि बाब लक्षात घेवून शासनामार्फत सन २०२२-२०२३3 ते २०२७-२०२८ या कालावधीत राज्यभरात डॉ. पंजावबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवसापन यंत्रणा आत्मा, भंडारा यांच्यमार्फत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे हस्ते झाले. कार्यक्रमासाठी प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती उर्मिला चिखले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती संगिता माने, प्रकल्प उपसंचालक आत्मा अजय राऊत, जय किसान शेतकरी गट वाशिम चे संचालक श्री. संतोष चव्हाण, नैसर्गिक शेती तज्ञ श्री हेमंतसिंह चव्हाण, स्मार्ट नोडल अधिकारी शशांतीलाल गायधने, उपविभागीय कृषि अधिकारी अविनाश कोटांगले आदी मान्यवर उपिस्थत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा श्रीमती उर्मिला चिखले यांनी केले योजनेअंतर्गत पुढील ३ वर्षात प्रति वर्ष ९० गट व ४५०० शेतक-यांचा समावेश केला जाणार असल्याने अधिकाअधिक शेतक-यांनी योजनेचा लाभ घेवुन सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी त्याच्याप्रास्ताविकात केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हाधिकरी योगेश कुंभेजकर यांनी उपस्थितांना नैसर्गिक शेतीचे महत्व ओळखुन जमिनीचा खालावत चाललेला पोत सुधारण्याच्या दृष्टिकोनातुन नैसर्गिक शेतीकडे वळावे, जिल्हयातील गावाचे मोनोक्रांपींग टाकून पिक फेरपालट करावे. सेद्रिंय शेतीतील प्रमाणीकरणाचे महत्व आदी बाबीवर प्रकाश टाकाला. शेतक-यांनी पिकनिहाय सेंद्रिय शेतीचे क्लस्टर जिल्हयात तयार करावेत त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मदत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी उपस्थित शेतक-यांना दिले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसिर्गक शेती मिशनच्या अंमलबजावणी बाबतच्या मार्गदर्शक सुचनांबाबत व योजनेत समाविष्ठ विविध घटकाबाबत प्रकल्प संचालक आत्म श्री. अजयराउत यांनी मार्गदर्शन केले.

नैसर्गिक शेतीची संकल्पना, त्यातील विविध निविष्ठा तयार करण्याच्या पध्दती त्यांचा शेतातील वापर व नैसिर्गिक शेतीतील कीड व्यवस्थापन आदी बाबींवर नैसर्गिक शेतीवरील मार्गदर्शक श्री. हेमंतसिंह चव्हाण यांनी केले.योजनेमध्ये सामाविष्ठ महत्वाची बाब म्हणजे नैसर्गिक शेतीतील निविष्ठांची निर्मीती ही शेतक-यांच्या बांधावरच करणे, अशा प्रकारची शेत बांधावरची निविष्ठा निमीर्ती केंद्र अल्प खर्चात कशी उभारता येतील याबाबत वाशिम येथील जय किसान शेतकरी गट वाशीम चे श्री. संतोष बी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण याबाबत निम फाउंडेशन नागपुरचे श्री. लक्ष्मीकांत पडोळे यांनी मार्गदर्शन केले.श्री. अविल बोरकर, ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांनी परंपरागत बियाणांचे संवर्धन व नैसर्गिक शेती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती करणारे जिल्हयातील शेतकरी श्री. तानाजी गायधने चिखली, श्री. राजेश गायधने लाखनी, श्री. ताराचंद लंजे, पिंडकेपार आदी शेतक-यांनी त्यांचे सेंद्रिय शेती बाबतचे अनुभवही या कार्यशाळेदरम्यान कथन केलेकार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.योगेश राउत यांनी तर आभार प्रदर्शन श्री. शांतीलाल गायधने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या व स्मार्ट प्रकल्पाच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी व क्षेत्रीय स्तरावरील बीटीएम/ एटीएम यांनी विशेष परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.