शिवरायांसारखे पुत्र घडवण्यासाठी मातांनो जिजाऊ बना- गजापुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदुर : “आजच्या काळात जर शिवाजी महाराजांसारखे नितीमान चरित्रसंपन्न अनेक संकट पार करून यशाला गवसणी घालणारे कार्यकुशल पुत्र घडवायचे असतील तर, माता जिजाऊ सारखे विचार करण्याची आणि तसे संस्कार देण्याची गरज आहे.” असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा.भारत गजापुरे यांनी केले. शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी विचाराचे बीज रुजवण्याहेतू विश्वशांती बौद्ध विहार व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबा यांच्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन २३ फेब्रुवारी रोजी विरली(बू) येथील आंबेडकर चौकात करण्यात आले होते. लाखांदूर तालुक्यातील विरली (बू) येथे सुद्धा या वर्षी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त येथे शिवव्याख्याते प्रा.भारत गजापूरे यांच्या शिवव्याख्यानातून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडण्याहेतू शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना, “जिजाऊ मातेने सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मनाची इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन, आणि बोलण्याचे कौशल्य” या तीन बाबींची शिकवण दिली. आणि त्या नुसार शिवाजी महाराज घडले. तशीच शिकवण आजच्या मातेने आपल्या मुलांना देण्याचा बहुमूल्य संदेश प्रा.भारत गजापूरे यांनी दिला. ाुढे बोलताना ते म्हणाले “नेमका इतिहास वाचायचा कशासाठी? आणि शिवजयंती साजरी करायची कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करीत शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आम्हाला घेता आला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जनतेने भरघोस प्रतिसाद दर्शविला आणि शिवव्याख्याते प्रा.भारत गजापुरे यांच्या शिवाव्यान्यातून उपस्थित श्रोत्यांमध्ये शिवशक्ती संचरल्याचा भास दिसून आला. या शिवव्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे आशिष ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक शंकर हुमने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.कामराज रामटेके, जोषेश वाढई आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे यांनी केले . तर संचालन कुणाल टेंभूरकर यांनी केले तर आभार उमेश जांगडे यांनी मानले. त्यानंतर, लगेच विद्यार्थी व लहान- मोठ्या बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याहेतू शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे सहउद्घटक म्हणून उद्योगपती आशिष सावरबांधे, अध्यक्ष म्हणून शामलिताई तºहेकर, उपाध्यक्ष म्हणून राजेश महावाडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शरद हुमने, शादिक खा पठाण, गुरुदेव वकेकार, मनोज मोटघरे, उमेश जांगडे, डॉ.वासनिक, रवींद्र सुखदेवे, देवानंद महावाडे, गोपाल कोल्हे, चंद्रभान हुमने, जनाबाई घावडे, प्रतिभाताई घोसेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन कुणाल टेंभुरकर यांनी केले तर आभार युवराज सुखदेवे यांनी मानले. या शिवजयंती सोहळ्याच्या यशस्वितेसाठी बौद्ध समाज पंच कमिटी, ग्रामस्थ व समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी मोलाचे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *