विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जवळील मोहघाटा शेतशिवारातील विहिरीत बिबट पडला असल्याचे २ एप्रिलला सकाळी शेतात गेलेल्या मजूरांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच साकोली वनविभागाला माहिती देताच भंडारा व साकोली येथील अतिजलद बचाव दल, साकोली सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहचून ३० फूट खोल विहिरीतून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. या रेस्क्यू कार्यात साकोली वनपरीक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण, लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, अतिजलद बचाव दल प्रमुख तथा भंडारा वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, क्षेत्र सहायक उके, गस्ती पथक प्रमुख गुरबेले यांच्यासह साकोली, लाखनी व भंडारा येथील वन्यजीव विभागाचे कर्मचा-यांनी संयुक्त प्रयत्न करीत बिबटयाची विहिरीतून सुरक्षितपणे सुटका केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *