
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिल्ली/आंबाडी:- भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील विघ्नहर्ता बुक क्रियेशन कंपनीला शनिवारच्या मध्यरात्री अचानक आग लागली. त्यामुळे कपंनीच्या गोडाऊन मध्ये ठेवलेले १० ते १२ लाखाच्या कच्च्या मालाचे मोठा नुकसान झाले असून तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशन कारधा येथे देण्यात आली आहे.मात्र अध्यापही कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही, आंबाडी येथे धनराज भुरे यांच्या चाळीमध्ये विघ्नहर्ता नोटबुक क्रियेशन कपंनी मागील पाच वर्षापासून सुरू आहे.
शनिवारी नियमित कामे आटोपून कंपनीचे मालक मार्कंड बळीराम भुते आटपून घरी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरून दुकानातून धूर येत असून आग लागल्यासारखें दिसत असल्याचे फोन वरून सांगितले. त्यामुळे मार्कंड भुते यांना धक्का बसला असून त्वरित कंपनीत जाऊन शटर उघडले तेव्हा कंपनीतील साहित्य जाळून खाक झाल्याचे लक्षात आले असून पोलीस स्टेशन कारधा येथेतक्रार करण्यात आली आहे. अग्निशमन दलाला बोलावून आग नियंत्रित करण्यात आली. मात्र कंपनीतील लाखों रुपयाचे कच्चे साहित्य जळल्यामुळे कंपनी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाला आहे. नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावरून तसेच विमा कम्पनिकडून अर्थ सहाय्य मिळावे. अशी मार्कंड भुते यांची मागणी आहे.