तुमसर बाजार समितीत हमालांकडून शेतकºयांची लूट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषि उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकºयांची हमाल, मापारी व टोपलीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेना पदाधिकाºयांनी सभापती भाऊराव तुमसरे यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,अनेक वर्षांपासून शेतकºयांना वेठीस धरून विविध प्रकारे आर्थिक शोषण केले जात आहे. शेतमाल मोजताना आधी नंबर लावून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. तसेच मोजणीदरम्यान उरलेला शेतमाल परत न देणे, ‘झाळझुळी’च्या नावाखाली चोरी करणे, चहा-पाण्याची जबरदस्तीने मागणी करणे, काटापट्टी व सौदापट्टीचे अवैध पैसे घेणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय काही ठिकाणी काट्यावर पाय ठेवून वजनात फेरफार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकºयांनी तक्रार केल्यास त्यांच्या घरी जाऊन दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर मुद्दाही पुढे आला आहे. शेतकºयांच्या हितासाठी बाजार समितीत योग्य सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये शेतकºयांसाठी निवासी व वातानुकूलित विश्रांती व्यवस्था, तसेच दोन्ही वेळचे जेवण देण्याची मागणी आहे. तसेच शेतमाल विक्रीसाठी येताना ते घरी परत जाण्यापर्यंतअपघात किंवा मृत्यू झाल्यास विमा संरक्षण व सानुग्रह मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी इशारा दिला आहे की, वरील सर्व मागण्या चार दिवसांत पूर्ण न झाल्यास बोली प्रक्रिया बंद करून बाजार समितीसमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. उद्भवणाºया परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनावर अनिल गायधने, संजय कुंभलकर, दिपक गजभिये, नितीन सेलोकर, नरेश उचिबघेले, किरण अतकरी यांसह अनेक पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत. या प्रकरणाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी भंडारा, पणन संचालक पुणे, तसेच संबंधित शासकीय अधिकाºयांना देण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *