१०० टक्के इथेनॉल इंधनाला केंद्र सरकारने दिली मंजुरी

भंडारा पत्रिका/भंडारा नागपूर : पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलाचे संकट निर्माण झाले आहे. भारताला याची झळ बसत असून, केंद्र सरकारने पर्यायी इंधनाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने १०० टक्के इथेनॉल इंधन वापराला मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर आधारित विकसित करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ए100 इंधन वापरण्यास परवानगी दिल्याचे गडकरी म्हणाले. ए100 अर्थात फ्लेस फ्युएल वाहनांमध्ये शंभर टक्के इथेनॉल वापरण्याच्या प्रोजेक्टशी संबंधित फाईलवर सही केली असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे – गडकरी नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “मला हे सांगताना आनंद होतोय की, काल (१२ जून) रात्री ८ वाजता मी १०० टक्के इथेनॉलचा वापर करण्यास मंजुरी देणाºया फाईलवर स्वाक्षरी केली आहे. कधी काळी लोक यावर हसायचे. इथेनॉल प्रोजेक्ट रोखण्यासाठी नकारात्मक प्रचार मोहीम चालवल्या गेल्या. पण, आता हे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे”, अशा भावना नितीन गडकरींनी व्यक्त केल्या. पुढील दोन महिन्यात येणार आणखी वाहने नितीन गडकरी म्हणाले की, “पुढील दोन महिन्यांत आॅटोमोबाईल कंपन्या पूर्णपणेइथेनॉलवर चालणाºया गाड्या बाजारात आणणार आहेत. टोयोटा, सुझुकी, एमजी आणि ह्युंदाई यासारख्या कंपन्या पुढील दीड महिन्यात इथेनॉलवर आधारित वाहने बाजारात उतरवू शकतात.”

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *