ह्यत्या आगपीडितह्ण कुंभरे कुटुंबाला आ. नाना पटोलेकडून मदत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- तालुक्यातील पालेपेंढरी येथे एका गरीब कुटुंबाच्या राहत्या घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आणि संसाराचे साहित्य जळून खाक झाल्याची दुदैर्वी घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती मिळताच साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी दखल घेत, पीडित कुटुंबाला सर्व जीवनावश्यक साहित्य आणि रोख रकमेची तातडीची मदत पोहोचवली आहे. दिनांक १३ जून रोजी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.

पालेपेंढरी येथील रहिवासी परमेश्वर ज्ञानेश्वर कुंभरे आणि वषार्ताई परमेश्वर कुंभरे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर डोळ्यादेखत जळून खाक झाले, तसेच घरातील अन्नधान्य, कपडे व इतर जीवनापयोगी साहित्य नष्ट झाले. कुंभरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांच्या पदरात ६ वर्षांची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा अशी दोन लहान मुले आहेत. सर्व साहित्य जळाल्याने या कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली होती. सध्या त्यांची ही बिकट अवस्था पाहून गावकºयांनी त्यांना तात्पुरता राहण्यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटीच्या इमारतीत आसरा दिला आहे.

या घटनेची माहिती लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर यांनी आमदार नानाभाऊ पटोले यांना दिली. माहिती मिळताच आमदार पटोले यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सूचनेनुसार १३ जून रोजी पालेपेंढरी येथे जाऊन उत्तम भागडकर यांच्या हस्ते पीडित कुंभरे कुटुंबाला रोख रक्कम आणि सर्व जीवनावश्यक वस्तूं देण्यात आल्या. या मदतीमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबाला मोठा धीर मिळाला आहे. पीडित परमेश्वर कुंभरे हे अत्यंत गरीब असून त्यांचे हक्काचे घर पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता, या कुटुंबाला ‘घरकुल योजने’चा तात्काळ लाभ देऊन नवीन घर मंजूर करावे, अशी मागणी पालेपेंढरी येथील ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी माजी तालुकाअध्यक्ष उत्तम भागडकर, पालेपेंढरीचे सरपंच संतोष शिवणकर, उपसरपंच यशपाल मेश्राम, माजी उपसरपंच भोजराज नान्हे, सोमेश्वर मंगर यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *