
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील लोहारा येथे रविवारी (दि.२२ जून) दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान आकाशीय वीज कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली. विशेष म्हणजे, ज्या म्हशीला त्या चारत होत्या ती म्हैस या दुर्घटनेतून सुखरूप बचावली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिमलता भोजराम उचिबगेले (वय ५० वर्षे), रा. लोहारा या आपल्या म्हशीला शेत परिसरात चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी आकाशीय वीज त्यांच्या जवळ कोसळली. विजेचा तीव्र तडाखा बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीचमृत्यू झाला. मात्र, त्यांच्या जवळ असलेली म्हैस या दुर्घटनेतून बचावली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे उचिबगेले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भिमलता उचिबगेले या अत्यंत कष्टाळू स्वभावाच्या होत्या. त्या पतीसह मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक अवि- वाहित मुलगा तसेच दोन विवाहित मुली असा परिवार आहे. कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाºया सांभाळणाºया व्यक्तीचा अशा दुदैवी घटनेत मृत्यू झाल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक आणि भावनिक संकट उभे राहिले आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ग्रामस्थांनी शासनाकडे मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व आवश्यक सवलती देण्याची मागणी केली आहे. तसेच महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या आपत्ती मदत योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत विजांच्या कडकडाटाच्या घटना वाढत असल्याने शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करणाºया नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.