भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यात महसूल व वन जमिनीवर शेतीसाठी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर तात्काळ आणि थेट दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा ‘गाव तिथे आंदोलन’ छेडले जाईल, असा तीव्र इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेने प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाम यांच्या नेतृत्वाखाली व तुमसर तालुका सचिव राजेश बावणे यांनी हे निवेदन सादर केले. या निवेदनात मौजा मोहगाव येथील अतिक्रमण प्रकरणाचा ठोस दाखला देण्यात आला आहे. मोहगाव प्रकरणात १८ जणांवर कारवाई मौजा मोहगाव येथे शिवदास सोमा शेंद्रे यांच्यासह एकूण १८ जणांनी वन वमहसूल जमिनीवर अतिक्रमण करून शेती केल्याचे तलाठी (मोहगाव) व क्षेत्र सहाय्यक (तुमसर) यांच्या संयुक्त पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.
या निष्कर्षाच्या आधारे वन परिक्षेत्र कार्यालय, तुमसर यांनी आदेश क्रमांक क्र/वपआ/तुम/६७७/ दिनांक ४ जुलै २०२६ नुसार संबंधित अतिक्रमणधारकांवर प्रत्येकी २,००० रुपयांचा दंड आकारला आहे. पिकांच्या पंचनाम्याची मागणी सध्या या अतिक्रमित जमिनीवर पेरणी करण्यात आलेली असून, त्या पिकांचा देखील रीतसर पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा दीर्घव क्लिष्ट कालावधी टाळून मोहगाव पॅटर्ननुसार इतर सर्व प्रकरणांमध्येही वन विभागाच्या स्तरावरच थेट दंडात्मक कारवाई करून प्रश्न निकाली काढावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावोगावी तीव्र आंदोलन प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेतली नाही, तर तालुक्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी ‘गाव तिथे आंदोलर्न’ छेडून तीव्र संघर्ष उभा केला जाईल, असा इशारा तालुका सचिव राजेश बावणे यांनी दिला. यावेळी शीला गौतम, रविलाल गुद्देवार, ओमप्रकाश चौधरी, फागुलाल सहारे, बाळा कावडे, सुखदास शेंडे, फागु राऊत, राहुल मेश्राम, सुभाष मेश्राम, गेदन बागडे, उर्मिला ठाकरे, मीरा देव्हारे, फुलणबाई ठाकरे, शिलाबाई उइके, झामसिंग परतेती, ज्ञानेश्वर लोणकर आदी उपस्थित होते.