भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि युवकांनी व्यसनां पासून दूर राहावे, या उद्देशाने तिरोडा पोलीस ठाण्याच्या वतीने २२ ते ३० आॅक्टोंबरदरम्यान अमली पदार्थविरोधी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, कॅरम, पथनाट्य तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या आदेशानुसार हे उपक्रम राबविण्यात आले. स्पर्धांमध्ये यश संपादन करणाºया विद्यार्थ्यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अमित वानखडे उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत तिरोडा येथील अक्षय रामदयाल बागडे याने प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी मिळविली. निबंध स्पर्धेत आयुष अश्विन बागडे याने प्रथम क्रमांक मिळविला. मुलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रवीण विजय उईके प्रथम, तर जोगेश्वर अनिल मसराम द्वितीय ठरला. मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रवींद्र चंदुलाल उईके याने प्रथम, तर रणवीर चरणदास उईके याने द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेत निकिता हरिदास उईके हिने १०० व ४०० मीटर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. ज्ञानेश्वर ललित बावनकर हिने ४०० मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला, तर मुलींच्या १०० मीटर स्पर्धेत दिव्या फागुलाल ठाकरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
कोयलारी आदिवासी आश्रमशाळेत आयोजित व्हॉलीबॉल, कॅरम व गोळाफेक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णा वसंत सोयाम याच्या नेतृत्वाखालील संघाने यश मिळविले. कॅरम स्पर्धेत नैतिक हंसराज शिरसाट, तर गोळाफेक स्पर्धेत शत्रुघ्न हेमराज जुडा याने यश संपादन केले. मेरिटेरियस शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्य समूहाचाही प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच क्रीडा, सांस्कृतिक व बौद्धिक गुणांना वाव मिळाला. अभियान यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम नष्टे, हवालदार दीपक खांडेकर, पोलीस शिपाई अख्तर शेख, धनंजय बारई, नितेश नंदनवार व सचिन मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
