कुत्रा दुचाकीसमोर आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर: लाखांदूर येथून आपल्या स्वगावी जात असताना अचानक कुत्रा दुचाकीसमोर आडवा आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना आज, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाय. सी. कॉलेजसमोर घडली. या अपघातात सचिन देवचरण साखरे वय (३८) वर्षे, रा. गांधीनगर, तालुका वडसा, जिल्हा गडचिरोली हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, सचिन साखरे हे काही कामानिमित्त लाखांदूर येथे आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने आपल्या स्वगावी गांधीनगर येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, लाखांदूर शहरातील वडसा साकोली मार्गावर वाय. सी. कॉलेजसमोर अचानक एक कुत्रा त्यांच्या दुचाकीसमोर आडवा आल्याने दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटले.

परिणामी, दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी सचिन यांना उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी त्यांची तपासणी केली. प्रकृती व दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अचानक रस्त्यावर येणाºया भटक्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *