● अल्पवयीन बालकाची बालसुधारगृहात रवानगी ● गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व दोन चाकूही हस्तगत
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी / तिरोडा : संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या वर्षा तुरकर हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. नियोजनपूर्वक घडवून आणलेल्या या हत्याकांडात एकूण सहा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला २३ नोव्हेंबर रोजी पालकांसह गोंदिया येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार या अल्पवयीन बालकाची नागपूर येथील बाल संरक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे.
या हत्याकांडामागे तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. त्यापैकी जवळपास ९ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय हत्येसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन चाकूही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि हत्येच्या कटाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
वर्षा तुरकर यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी संबंधित आरोपींना १३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. या सुपारीच्या रकमेपैकी जवळपास ९ लाख रुपये पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत. उर्वरित रक्कम तसेच या आर्थिक व्यवहारामागील संपूर्ण साखळीचा तपास पोलीस करीत आहेत. हत्येसाठी एवढी मोठी रक्कम देण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
या हत्याकांडाशी संबंधित आणखी काही साहित्य आणि पुरावे जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. सुपारीची रक्कम, हत्येत वापरलेली मोटरसायकल आणि दोन चाकू जप्त करण्यात आल्याने तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या गुन्ह्यामागील कट, आर्थिक व्यवहार आणि आरोपींच्या भूमिकेच्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने करीत असून, पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस निरीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.
वर्षा तुरकर हत्याकांडात सहापैकी पाच आरोपींना अटक, अल्पवयीन आरोपीची बाल संरक्षण गृहात रवानगी आणि १३ लाखांच्या सुपारीपैकी ९ लाखांची रक्कम जप्त झाल्याने या प्रकरणातील तपासाला निर्णायक गती मिळाली आहे.
हत्येत वापरलेली मोटरसायकल आणि दोन चाकू जप्त हत्याकांडात आरोपींनी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आरोपींनी २२ नोव्हेंबरच्या रात्री मुर्री येथील स्मशानघाट परिसरात लपवून ठेवल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी घटनास्थळावरून हे दोन्ही चाकू हस्तगत केले आहेत. हत्याकांडात वापरण्यात आलेली शस्त्रे आणि वाहन जप्त झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
अल्पवयीन आरोपीची नागपूर बाल संरक्षण गृहात रवानगी या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीचे वय अल्प असल्याने त्याच्याविरुद्ध बाल न्यायव्यवस्थेच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. २३ नोव्हेंबर रोजी त्याला पालकांसह गोंदिया येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची नागपूर येथील बाल संरक्षण गृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
