सीतासावांगी येथे अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नाकाडोंगरी : अनुकंपा रोजगार योजनेतील करण्यात आलेल्या बदलांना विरोध तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सीतासावांगी येथील बाजार चौकात अनिश्चितकालीन आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मायलद्वारे अनुकंपा रोजगार योजनेत करण्यात आलेले बदल तात्काळ मागे घ्यावेत, सेवाकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाºयांच्या प्रकरणात अनुकंपा नियुक्तीची पात्रता पूर्ववत करावी, मेडिकल अनफिट घोषित कर्मचाºयांना व त्यांच्या आश्रितांना तातडीने अनुकंपा/मेडिकलनियुक्तीचा लाभ द्यावा, तसेच सेवानिवृत्तीला ३ ते ५ वर्षे शिल्लक असलेल्या आणि मेडिकल अनफिट असूनही कार्यरत असलेल्या कर्मचाºयांची बदली भरती करावी, या मागण्यांचा समावेश आहे. तसेच मृत कर्मचाºयांच्या कुटुंबियांना सेटलमेंट/अनुकंपा लाभ देताना लागू असलेली ६ लाख वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे. उपोषणकर्ते इंजी. प्रकाशकुमारकमलेश धिकोडी, सरपंच सीतासावांगी तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भंडारा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आंदोलनास कृष्णकांत बघेल (जिल्हा परिषद सदस्य), नरेंद्र गेडाम (पंचायत समिती सदस्य), नदीम पाशा (उपसरपंच सीतासावांगी), करूना कोकोडे (सरपंच चिखला), नेहा मेश्राम (सरपंच बालापूर), वृषभ मेश्राम (ग्राम पंचायत सदस्य), ईश्वर तिरपुडे, महेश मिश्रा व दुर्गा परतेती यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. पहिल्या दिवशी आंदोलन शांततेत पार पडले असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *