
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांनी ४ एप्रिल रोजी होत असलेल्या जिल्हा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना चे जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन सिहोरा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांचा जिल्हा मेळावा राज्याचे अध्यक्ष विलास भाऊ कुमरवार यांचे अध्यक्षतेखाली लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे होत असून या मेळाव्याला राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे , राज्य प्रसिद्धी प्रमुख गणेश कोळसे, राज्य संघटक राजेश दिवटे, नागपूर विभागीय अध्यक्ष हेमराज वाघाळे व भंडारा जिल्हाध्यक्ष मारुती चेटुले हे उपस्थित राहणार आहेत.
या जिल्हा मेळाव्यात भंडारा जिल्हा व नागपूर विभागीय आढावा हा प्रमुख विषय असल्यामुळे या मेळाव्याला व आढाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन, कवळू ठलाल, प्रदीप राऊत, उमेश कोरे, कैलास नाणे, शेखर रहांगडाले, ओमदेव लांजेवार, नानेश्वर मेश्राम, माणिक लांबट, सुनील माकडे, संतोष पंचबुद्धे, मुरलीधर उरकुडे, शैलेश चंद्रिकापुरे, होमराज डोंगरवार, नितेश मेश्राम व राजेश मेश्राम यांनी केले आहे.