रानटी हत्तींसह वन्यप्राण्यांचा हैदोस;बाराभाटी, बोळदे शेतशिवारात हत्तींचे बस्तान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्ती बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा मोठा हैदोस वाढला असून हे वन्यप्राणी जिवीत हाणीसह मका, धान, व अन्य पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुका घनदाट जंगलाने वेढलेला असून जंगलातील सरपन व शिकारीचे प्रमाण नसल्यातच जमा असल्याने हिंस्त्र वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तालुक्यात ३० ते ३५ संख्या असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धुडगूस माजवलेला आहे. गेल्या एक दिड महिन्याभरांपासून गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या या रानटी हत्तीच्या कळपाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा हत्तीचा कळप वडेगाव/ बंध्या, खोळदा, पुष्पनगर व कशोरी जंगल परिसर व जवळूनच वाहत असलेल्या गाढवी नदीच्या सभोवतालच रहात असताना या परिसरातील शकडो एकर शेतातील पिके उध्वस्त केली आहे. त्यातच या हत्तीच्या कळपाने आता वडेगाव केशोरी परिसरातुन आपला मोर्चा आता तालुकास्थळापासून दहा ते पंधरा कि.मी अंतर- ावरील बाराभाटी, बोळदे, कवठा या परीसराकडे वळविला आहे. विशेष म्हणजे, या हत्तीच्या कळपाने १४ एफ्रिल च्या रात्री बाराभाटी बोळदे परिसरातील किशोर येरणे यांचे शेतातील मकापिकाची मोठी नासधुस केली आहे. तर कैलास येरणे, नारायण येरणे, चरणदास जोशी, मारोती साऊसकार यांचेही शेतातील मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासधुस केली आहे. हाती आलेले मका पिक हत्तींनी नासधुस केल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *